मा.रतिलाल चौधर यांचे पोलीस सेवेतील कर्तव्यकाल अष्टपैलू ,दमदार…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मा.रतिलाल चौधर यांचे पोलीस सेवेतील कर्तव्यकाल अष्टपैलू ,दमदार…..

(निलेश गायकवाड)

पोलीस अधीक्षक मा.संदीप सिंह गिलसाहेब यांचे हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा.गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी मा.सुदर्शन राठोड ,बऱ्हाणपूर पोलीस मुख्यालय विभागाचे उपविभागीय अधिकारी मा. बुट्टे साहेब यांच्या उपस्थितीत पालखी सोहळानिमित्त उत्कृष्टरित्या कामगिरी केल्याने मा.रतिलाल आर.चौधरसर ,पोलीस अधिकारी, वालचंदनगर पोलिस स्टेशन यांचा प्रशंसापत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे.

मा.रतिलाल चौधरसर हे झपाटलेले,प्रमाणिक
सचोटी, कर्तव्यपरायण पोलिस अधिकारी आहेत.पोलीस सेवेतील त्यांची संपूर्ण सेवा त्यांनी झोकून देऊन केलेली आहे.सेवेला पूर्ण न्याय दिलेला आहे.तंटामुक्ती अभियानांतर्गत अनेक तंटे मिटविले आहेत.ग्रामसुरक्षा पथकातून समाजप्रबोधनाचे, संरक्षणाचे काम तरूणांच्या मदतीने केलेले आहे.

मा.रतिलाल चौधरसरच्या सहवासात येणारा प्रत्येकजन मग तो साव असो नाहीतर गुन्हेगार असो सुधारणा करणार हे कौतुकास्पद आहे.
मा.चौधरसर बोलताना हे पोलीस अधिकारी म्हणून वाटत नाही,तर ते कुटुंबातील मोठा माणूस समोरच्या शिकतोय, समजून सांगतोय असे वाटते.गुन्हेगार प्रवृत्ती मूळापासून नष्ट करण्यासाठी , गुन्हेगारांच्यातील चांगली संस्कृती जागी केली पाहिजे, याकडे मा.चौधरसर यांचा जास्त कल आहे.

नोकरीचा आलेख स्वकर्तुत्वाने गाजविणारे ,अनेक पुरस्कार प्राप्त अलंकाराकृत दैदिप्यमान सेवा करणारे
मा.रतिलाल चौधरसर यांचा पोलिस सेवेतील कर्तव्यकाल अष्टपैलू दमदार आहे,त्यांचा सदैव अभिमान वाटत राहील.

प्रत्येक माणूस आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो,नंतर संपतो, काहींना जग विसरते, काहींना विसरत नाही,
काहींच्या कर्तृत्ववातून आईवडिलांचे नाव रोशन होते, कुटुंबातील सर्वांचे नाव रोशन होते,त्यात मा.रतिलाल चौधरसर अग्रेसर आहेत,याची इतिहास नक्कीच नोंद घेईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!