आषाढी एकादशी निमित्त पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा सत्कार
संत सखाराम महाराज संस्थानकडून सन्मान..
अमळनेर : विक्की जाधव
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही शहर व परिसरातून हजारो भाविकांनी “माऊली माऊली” च्या जयघोषात वाडी येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थान येथे दर्शनासाठी गर्दी केली. या वेळी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली दक्षता व बंदोबस्त यशस्वी ठरला.
शहरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी पोलीस निरीक्षक पीआय दत्तात्रय निकम यांनी अत्यंत कुशलतेने जबाबदारी पार पाडली. त्यांच्यासह पोलीस कर्मचारी सुनील पाटील, संजय बोरसे, सिद्दू यांच्यासह महिला होमगार्ड व इतर पोलीस अंमलदारांनीही अत्यंत नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला.

या योगदानाची दखल घेत संत सखाराम महाराज संस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. भाविकांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पाडल्याबद्दल सर्वच स्तरातून अमळनेर पोलीस प्रशासनाचे कौतुक होत. आहे.