अमळनेरच्या राजकारणात सच्च्या कार्यकर्त्यांचा आणि कर्तृत्ववान नेत्याचा आदर्श अनिल दादा : गोपी कसार माजी नगरसेवक

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या राजकारणात सच्च्या कार्यकर्त्यांचा आणि कर्तृत्ववान नेत्याचा आदर्श अनिल दादा : गोपी कसार माजी नगरसेवक अमळनेर न.पा.

अमळनेर : प्रतिनिधी

अमळनेरच्या राजकारणात सच्च्या कार्यकर्त्यांचा आणि कर्तृत्ववान नेत्याचा आदर्श मानले जाणारे आमदार दादासो अनिल पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा संपूर्ण अमळनेर तालुका साक्षीदार आहे. मागील टर्ममध्ये राज्याच्या मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अमळनेर तालुक्याला भरघोस निधी मिळवून दिला. त्या निधीच्या योग्य वापरातून तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या विकासकामांना गती मिळाली.

अमळनेरच्या राजकारणात आणि विकासाच्या प्रवासात ‘भूतकाळातही न झालेले आणि भविष्यातही दुर्लभ ठरणारे’ असे बदल घडवून आणणारे आमदार अनिल पाटील हे नाव आज घराघरात आदराने घेतले जाते.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक गोपीभाऊ कासार यांनी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या. “दादासो अनिल पाटलांनी जे अमळनेरच्या विकासासाठी योगदान दिलं आहे, ते विसरणं अशक्य आहे. आजचा दिवस हा त्यांचं कार्य स्मरणात ठेवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले.

“असेच आपल्या कार्यामुळे अमळनेरचा विकास अधिक जोमाने होऊ दे,” अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!