आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्याचे लोकप्रिय आमदार व माजी मंत्री मा. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी व सभासदांसाठी ७ जुलै, सोमवार रोजी दुपारी ४ वाजता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील बैलजोडी असणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना पोळा सणासाठी बैलांच्या साजाचे वाटप करण्यात येणार असून, याचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यासोबतच अनिल पाटील यांची शैक्षणिक साहित्याच्या तुला करण्यात येणार असून, यानंतर या साहित्याचे वाटप तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. शिक्षणविषयक या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक मदत मिळणार आहे.

तसेच बाजार समितीतील मापाडी कामगारांसाठी स्वतंत्र लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक मापाडी कामगाराला वैयक्तिक लॉकरच्या किल्ल्यांचे वाटप आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळाने एकत्रितपणे सर्व शेतकरी सभासद तसेच आमदार अनिल पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना सकाळी ४ वाजता बाजार समितीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!