July 1, 2025 6:45 am

ढेकू रोड प्रभागातील कॉलनी भागात बाभूळ मुक्त अभियानाचा शुभारंभ

अपनी भाषा में पढ़े! Translate

ढेकू रोड प्रभागातील कॉलनी भागात बाभूळ मुक्त अभियानाचा शुभारंभ

प्रभागातील नागरिकांकडून संकल्पनेच कौतुक,प्रभाग स्वच्छ व सूंदर होणार

अमळनेर(प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक ७ ढेकू रोड भागातील नागरी वस्तीभागात नगरसेविका गायत्री दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून बाभूळ मुक्त अभियानाला सुरवात करण्यात आली.
प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका गायत्री दीपक पाटील व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दीपक मणीलाल पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण प्रभाग क्रमांक ७ मधील नागरी वस्तीतील खुल्या भूखंडावर अवाढव्य वाढलेले बाभूळ व इतर काटेरी वनस्पती काढून टाकण्यासाठी व प्रभागाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी बाभूळ मुक्त अभियान ही मोहीम हातात घेण्यात आली आहे.
मोकाट प्राणी(डुक्कर,कुत्री) मोठ्या प्रमाणात या झुडपांच्या आडोशाला लपून बसतात,तसेच चोरट्यांना देखील रात्रीच्या वेळी लपण्यासाठी याचा फायदा होत असतो तसेच डासांची उत्पत्ती देखील होत असते या सर्वच गोष्टींचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो,यामुळे ही संकल्पना हाती घेण्यात आलेली आहे.या आगळ्यावेगळ्या संकल्पनेच नागरिकांनी स्वागत केलं असून प्रभाग सुंदर होण्यासाठी याची मदत होणार आहे.
२७ फेब्रुवारी रोजी गायत्री नगर,वामन नगर,महात्मा फुले कॉलनी, तसेच इतर भागात जे.सी.बी च्या सहाय्याने कामाला सुरुवात झाली यावेळी डी.इ.पाटील,गुलाबराव पवार,संजय बोरसे,शरद शिसोदे,विजय बडगुजर,मनोहर सोनार,पी.आर.पवार,किशोर मगर,दिलीप भामरे,योगेश्वर पाटील,विजय पाटील,के.के.पाटील,अनिल पाटील,डी.आर.पाटील,परेश मगर,पंकज पाटील,अनिकेत पाटील, यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. दीपक पाटील यांच्या संकल्पनेचे आमदार अनिल पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील,जि.प.सदस्या जयश्री पाटील यासह प्रभागातील नागरिकांनी कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!