June 28, 2025 5:39 pm

हायकोर्टाने अ‍ॅट्रॉसिटी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला!

अपनी भाषा में पढ़े! Translate

हायकोर्टाने अ‍ॅट्रॉसिटी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला!

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव

सोनू वाघ यांच्या विरोधात दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात मोठा वळण आले असून, माननीय उच्च न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

या संधर्भात सविस्तरवृत्त असे की, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी वारंवार वाद घालत असून, घटनेच्या दिवशी तिला दंडाला धरून ढकलत जातिवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी औरंगाबाद पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यात आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र तोही फेटाळण्यात आला. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान पीडितेच्या वतीने ॲड. निलेश भागवत यांनी ठाम व कायदेशीर युक्तिवाद मांडले.

प्रथमदर्शनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सिद्ध होतो आहे, हे लक्षात घेऊन माननीय उच्च न्यायालयाने जामीन नाकारत आरोपीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेस चालना मिळाली असून, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!