June 28, 2025 8:52 pm

एस. टी. कर्मचारी विजय वाडेकर यांनी एलएलबीची पदवी घेऊन केली वडिलांची इच्छापूर्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

एस. टी. कर्मचारी विजय वाडेकर यांनी एलएलबीची पदवी घेऊन केली वडिलांची इच्छापूर्ती

 

अमळनेर : विक्की जाधव 

येथील एस.टी.आगाराचे कर्मचारी तथा लिपिक विजय भटू वाडेकर यांनी केवळ स्वर्गवासी वडिलांची इच्छा म्हणून एलएलबीची पदवी घेऊन वडिलांची इच्छापूर्ती केली आहे. विजय वाडेकर हे निंभोरा तालुका अमळनेर येथील मूळ रहिवासी असून याआधी त्यांचे शिक्षण एम.ए.बी.एड.पर्यंत झाले

आहे. सामान्य परिस्थितीतील कुटुंबात जन्म घेतला असताना मेहनतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संधी आली म्हणून सुरवातीला दोन वर्षे रा.प.महामंडळ अमळनेर येथे दोन वर्ष वाहक पदावर देखील विजय वाडेकर यांनी केली.वडिलांची इच्छापूर्ती काम केले. त्यानंतर सेवांतर्गत परीक्षा देऊन त्यांना लिपिक पदावर बढती मिळाली होती. सद्यस्थितीत ते अमळनेर आगारात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आपला मुलगा गुणी असल्याने तो वकील व्हावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु वडील हयात असताना त्यांना प्रपंचाकरिता नोकरी स्वीकारावी लागल्याने वडिलांचे स्वप्न ते पूर्ण करू शकले नव्हते. मात्र वडील गेल्यानंतर त्यांनी एलएलबीला प्रवेश घेऊन

 

आपले कर्तव्य सांभाळत जिद्दीने अभ्यास करत विधी शास्त्राची पदवी प्राप्त करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. सदर यशाबद्दल अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी तसेच अमळनेर व्यवस्थापक तसेच सर्व आगार रा.प.म.कामगार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच निंभोरा गावातील नागरिकांनी ही अभिनंदन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!