June 28, 2025 8:44 pm

दिलेल्या शब्दाला जागत उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदासाठी कुणाचं नाव जाहीर करणार?

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिलेल्या शब्दाला जागत उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदासाठी कुणाचं नाव जाहीर करणार?

बारामती (विशेष प्रतिनिधी – संदिप आढाव)

माळेगाव प्रतिनिधी -संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या चेअरमन पदाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार करणार का? याकडे संपूर्ण तालुक्यासह १९ हजार सातशे सभासदांचे लक्ष लागले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे.काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा चेअरमन पदाचा उमेदवार अर्ज माघारीनंतर लगेचच जाहीर केला जाईल असा शब्द दिला होता.
दिलेला शब्दाला जागणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पाहिले जाते.यामुळे चेअरमन पदासाठी उमेदवाराचे नाव ते जाहीर करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात चेअरमन पदाचा उमेदवार कोण आहे? हे मात्र नक्की सांगता येणार नाही.अनेक नावांची चर्चा जरी असली तरी हि अजित पवार एखादा धक्का देऊ शकतात.ज्या अर्थी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याअर्थी ते देखील चेअरमनपदाचे उमेदवार असु शकतात अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!