विज पडुन मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आ.दानवे कडुन विस लाख रुपयांचे धनादेश वाटप.
प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश वाटप.
सुरंगली वार्ताहर ।
सुरंगली येथील कै.बाजीराव रामराव दांडगे,कोठा कोळी येथील कै .गणेश प्रकाश जाधव, स्व.सचिन विलास बावस्कर, केदार खेडा येथील स्व.राहुल विठ्ठल जाधव, सिपोरा बाजार येथील स्व.रामदास आंनदा कड या पाच जणांचा अंगावर विज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश आमदार संतोष भाऊ रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज देण्यात आले. यावेळी भोकरदन चे तहसीलदार संतोष बनकर यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.