हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त सह शिक्षिका सुधा गायकवाड यांचा सत्कार..
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
इंदापूर येथील श्री.नारायणदास रामदास हायस्कूलच्या सह शिक्षिका सुधा शहाजीराव गायकवाड सेवानिवृत्त झाल्या आहेत. सेवानिवृत्त निमित्ताने शुक्रवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष तसेच राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सुधा गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुधा गायकवाड यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे संचालक विलास वाघमोडे, पंजाबराव गायकवाड, नगरसेवक कैलास कदम, मुख्याध्यापक विकास फलफले, माजी गटशिक्षणाधिकारी शहाजीराव गायकवाड, माजी मुख्याध्यापक प्रकाश ठाकूर, माजी मुख्याध्यापिका झुंबर घाडगे, आशा सर्जेराव तसेच सहशिक्षक शंकर हुबाले उपस्थित होते.