July 1, 2025 1:09 pm

अखेर ग्राम रोजगार सेवक निलंबित!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अखेर ग्राम रोजगार सेवक निलंबित!

मालेवाडा ग्रामपंचायत मधील मग्रारोहयोतील भ्रष्टाचाराचे प्रकरण

भिवापूर पंचायत समिती अंतर्गत मालेवाडा येथील ग्राम रोजगार सेवक देवचंद शंकर करकाडे यांना आजच्या ग्रा.पं.मासिक सभेत निलंबित करण्याचा निर्णय सर्वानुमते पारित करण्यात आला. मालेवाडा येथील मग्रारोहयोतील घरकुल, सिंचन विहिर, वृक्षलागवड आदी कामावर दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीला व ग्रामपंचायतला केली होती. त्यानुसार आज दि २२ रोजी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत विषय क्रमांक ९ नुसार ग्रामरोजगार सेवकाच्या तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार गावातील १८ ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतला तक्रारी झाल्या असून त्याच्या वैयक्तिक योजनांच्या मस्टरमध्ये रोजगार सेवकाच्या कुटुंबातील सदस्यांची नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्राम रोजगार सेवकाला निलंबित करण्याचा निर्णय मासिक सभेने घेतला.
बैठकीला सरपंच विष्णू कोडापे, उपसरपंच प्रशांत इंगोले, सदस्य विघ्नेश्वर रामटेके, रुपेश सातपुते, राहूल गोवारदिपे, सुनंदा आंभोरे , कल्पना सुर्यवंशी, संगिता चट्टे, वर्षा इंगोले उपस्थित होते.

कारवाई टाळण्यासाठी राजिनामा नाट्य

ग्रामरोजगार सेवकाने मासिक सभा सुरू होण्यापूर्वी राजीनामा सादर केला. मात्र मासिक सभेने लाभार्थ्यांचे झालेले नुकसान व्याजासहित परत मिळण्यात यावी अशी मागणी केली. त्याकरिता रोजगार सेवकाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून सध्या निलंबित करण्याचा निर्णय घेतला. रोजगार सेवकांचे राजीनामा नाट्य पैसे वसुलीची कारवाई टाळण्यासाठी असावी हे सांगायला कोणत्याही जोतिष्याची गरज नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!