दादमहाल वॉर्ड परिसर येथे शिवजन्मोत्सव सोहळा
प्रतिनिधी-विजय केळझरकर
शहरातील दादमहाल वॉर्ड परिसर येथे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा,चन्द्रपुर-दादमहाल वॉर्ड चंद्रपूर येथील हनुमान मंदिर समिती,सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ,माँ भुमी शारदोत्सव मंडळ,युथ फौंडेशन,नाग मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साई प्रोडक्शन च्या सहकार्याने स्वराज्य संस्थापक रयतेचे सर्वप्रिय छत्रपती शिवाजी महाराज जयंती परिसरातील मुख्य चौक येथे साजरी करण्यात आली.हनुमान मंदिर समिती चे प्रमुख अध्यक्ष श्री.मा.संजयजी मोगरे,आणि प्रमुख पाहुणे लोकमान्य कन्या विद्यालय चे शिक्षक प्रशांत आरवे सर तर्फे दिपप्रजवलन आणि महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,सोबतच श्री.मा.अरुणजी आईटलावार,श्रीरामजी चहारे,मुन्नाजी मलीक,रतन भट्टी, अशपाक अन्सारी,केशवजी रासपायले यांनी महाराजांना नमन करून व्यासपीठावर स्थानापन्न झाले.या क्षणी परिसरातील नागरिकां तर्फे देखील महाराजांना अभिवादन करण्यात आले.सोबतच परिसरामधील रहिवासी तर्फे नमन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणं श्री.शैलेश सु.इंगोले तर्फे उपस्थितांसमोर सादर करण्यात आले.
सोहळा निमित्ताने भव्य आतिषबाजी ने बालछत्रपती महाराजांची वेषभूषा परिधान करून वंश संदीप रामगुंडेवार यांनी व्यासपीठावर येऊन सर्व उपस्थितांचे मन वेधले आणि संपुर्ण वातावरण प्रकाशित झाले.
रश्मी ताई हिवरे आणि सोनाली ताई आगळे तर्फे शिवगीत गायन करून उपस्थितांचे मन जिंकले.
लोकडॉउन काळात पहिल्या टप्प्यात 46 दिवस दररोज 500+ अधिक गरजूंना अन्नसेवा,तसेच दुसऱ्या टप्प्यात 36 दिवस शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथिल रुग्णाच्या नातेवाईकांना दररोज नाश्ता मिश्र फळे,चहा बिस्कीट वाटप करून निस्वार्थी सेवा बजावल्याबद्दल कोरोना योद्धा सत्कार या हेतूने,तसेच विविध सेवाभावी कार्याबद्दल गणेशभाऊ रामगुंडेवार यांचे सत्कार या क्षणी करण्यात आलेत.या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मानबिंदु ठेऊनच भविष्यात उज्वल समाज घडविण्यासाठीची प्रत्येकाने पुढाकार घ्यावे व सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्ये पालन करून जागृत नागरिक निर्मिती करण्यास सहाय्य करावे असे मार्गदर्शन गणेश भाऊ रामगुंडेवार यांनी या क्षणी उपस्थित मुलां-मुलींना तसेच युवकांना संभोधित करतांना म्हटले.या शुभ दिनी आयोजित चित्रकला,निबंध,शुद्धलेखन,भाषण स्पर्धा मध्ये मधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आलेत.वभाषण स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक विजेते प्रीत म्हशाखेत्री,द्वितीय विजेते ओम तुरीले यांचा सत्कार व बक्षीस देण्यात आले.निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक यामिनी निमजे,व्दितीय क्रमांक श्रुष्टी अलेवार,आणि शुध्दलेखन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक अनम शमी पठाण,आणि द्वितीय क्रमांक अनिशा उरकुडे,बाल गटातील चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक रुद्र चहारे,द्वितीय क्रमांक प्रशांत बेले,तृतीय क्रमांक कृतिका उपरकार यांनी पटकावले.वय बारा च्या वरील वयोगटातील चित्रकला स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक शुभम अधिकारी,द्वितीय क्रमांक केतकी उपरे,तृतीय क्रमांक ऋतुजा घडुले,यांना परिसर युवा व जेष्ठांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.व बारा वर्षे खालील मुला मुलींना पण प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे रूपरेखा व स्वागत-सूत्रसंचालन प्राची नांदलवार,जय निखारे,शुभम मोगरे व विपिन येंगलवार या तर्फे परिपूर्ण झाले.आयोजित स्पर्धा ही युथ फौंडेशन चे प्रमुख अंकिता देशट्टीवार व पराग दिंडेवार यांचा सानिध्यात घेण्यात आले.
शिवजन्मोत्सव सोहळा आयोजन भव्य रुपात साजरा करण्यासाठी परिसरातील युवक शैलेश इंगोले,गणेश रामगुंडेवार,अभिजित मारोडकर,मोहन मंचलवार,आशिष अलचावार यांचा नेतृत्वात,राकेश कोंडावार,चेतन कोंडलेवार,राहुल चिंतलवार,मयुर चव्हाण,प्रणय एनगंधेवार,प्रतिक कटकमवार,विनोद कवठे,कुणाल आडेपवार,बापु गावंडे,प्रथमेश कोंडावार,प्रफुल एनगंधेवार,चेतन उरकुडे,राहुल हजारे,अंकेश शर्मा,मयुर आडेपवार,संतोष मेरूगवार,फारुख शेख,अभी चहारे,राज कटकमवार,सुमित आडेपवार,प्रसाद सावनकर,अक्षय कोटलवार,निलेश वांढरे,योमेश पेदूरवार,यश बंडीवार,सुमित मोगरे,विपीन येंगलवार आदींच्या सहकार्याने आयोजित बाल-स्पर्धा आणि शिवजयंती सोहळ्यास परिपूर्णता मिळाली.