June 30, 2025 6:34 pm

पोलिस शिपायांना सेवा कालावधीत उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीबाबत शासन निर्णय जारी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पोलिस शिपायांना सेवा कालावधीत उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीबाबत शासन निर्णय जारी

पोलिस शिपायांना सेवा कालवधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात, शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना, सेवा कालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून, अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप निरीक्षक, या पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातली ३८ हजार १६९ पदं, पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!