मध्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करणार -सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे
बारामती (सह-संपादक- संदीप आढाव)
धुलीवंदनाच्या दिवशी माध्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल यासाठी माळेगाव व परिसरात विविध ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहेत अशी माहिती माळेगाव बुद्रुक पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दिली.
मिरवणुकीत कुणीही मध्यप्राशन करणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी केले तसेच मद्यपी वाहनचालक स्टंटबाजी करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.