अन’ गांधीनगरच्या त्या माऊलीच्या घरावर तिच्या डोळयादेखत हातोडा पडला…
मार्मिम न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
अमळनेर शहराच्या विकास दाखवत गांधीनगर भागात काही दिवसा पूर्वी अतिक्रमण काढण्यात आले. एखादा मेला तर मोर्चे आणि मेणबत्ती घेऊन निघणारा आपला समाज आणि निवडणूक आली की सामान्यांना जनतेच्या पायाशी लोटांगण घालणारे लोकप्रतिनिधी त्यात बघणाऱ्यां समाजास त्यांच्या परिस्थितीची थोडी ही न्हवती जाण..
पालिका खुलासा करणार आज होणार सुनावणी..
काय होणार? हे सुनिच्चीत आहेच पण हातोडा चालवल्या नंतर त्या खुलास्याचे काय? असा प्रश्न गांधीनगर अतिक्रमण धरकांना पडला आहे. अमळनेर शहरात इतर ही ठिकाणी चांगल्या धन-धांडग्या नी अतिक्रमण केले आहे ते काढण्याची पालिकेची कधीही हिम्मत झाली नाही. असे गांधी नगर अतिक्रमण धारकांनी मार्मिक शी बोलतांना आपली खंत व्यक्त केली. येथे कोणी एका जातीचे नव्हे तर सर्व धर्माचे एकीच्या भावनेनें राहणाऱ्यावर कुटुंबांवर पालिकेने ग्रहण लावले आहे.
गांधीनगरच्या अतिक्रमण समस्येवर चर्चा करताना, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ज्यांच्या परिस्थितीची थोडीही जाण घेतलेली नाही, अशात नागरिकांची निराशा वाढली आहे.
त्या माऊलीच्या घरावर हातोडा पडत असताना, अतिक्रमणाच्या विरोधातच्या याचिकांचे निवारण होईल का याबाबत शंका उपस्थित होत आहे.
नगरपरिषद अतिक्रमणांच्या विरोधातील कार्यवाहीत काही ठिकाणी कठोर असल्याचे दिसत आहे, परंतु गांधीनगरमध्ये मात्र अतिक्रमण धारकांना ठोस कारवाईस सामोरे जावे लागले. “इतर ठिकाणी धनधांडग्यांच्या अतिक्रमणावर काहीही कारवाई झाली नाही,” अशी खंत गांधीनगर अतिक्रमण धारकांनी व्यक्त केली.
गांधीनगर मधील रहिवाशांनी ताराचंद चौधरी, सरुबाई ठाकूर, सुधाकर सूर्यवंशी, युनूस बागवान, यास्मिन बागवान यांची याचिका न्यायालयात दिली होती. परंतु, याचिका दाखल करताना उशीर झाल्यानें अतिक्रमणाबाबत निर्णय घेण्यात आले होते, त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी गंभीर बनली.
दुसरीकडे, गांधीनगर वासीयांना म्हाडा अंतर्गत घरकुल वितरणाबाबत संभ्रम आहे. “म्हाडाचे घर शहराबाहेर आहेत आणि दैनंदिन जीवनाच्या धडपडीतही त्याचा उपयोग होत नाही,” असे रहिवाशांचे म्हणणे आहे. “उपाय म्हणून आम्हाला आणखी गावा बाहेर काढण्याचे मनाशी ठरवले आहे का?” असा प्रश्न गांधीनगर अतिक्रमित सामान्य नागरिकांनी उपस्थित केला.
गांधीनगरमध्ये सर्व रहिवासी मजूर असल्याने, म्हाडा कॉलनीतून कामासाठी शहरात येणे-जाणे आणि मुलांचे शिक्षण यासाठी अडचणी निर्माण होतील. त्यामुळे नागरिकांनी मागणी केली आहे की, “आम्हाला शहरातच जागा द्यावी किंवा याच ठिकाणी राहू द्यावे.”
शहरातील अतिक्रमण समस्या :
अमळनेरच्या विविध भागात, जसे आर के नगर, चोपडा नाका, दगडी दरवाजाच्या आतील भाग, सराफ बाजार, भगवा चौक, पटवारी कॉलनी, इस्लामपुरा , आणि भागवत रोडवर असंख्य अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे.
यामध्ये शहराच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बिल्डरांचा देखील यात समावेश आहे.
अधिकार्यांना थोडे पैसे मिळाल्यावर या अतिक्रमणांवर लगेच स्थगती मिळत असल्याचे दिसते, परंतु गांधीनगरमध्ये असे काही घडलेले नाही असा स्थानिकांचा आरोप आहे.
या सर्व घटनांमुळे नागरिकांना आश्वासनाची आणि त्यांच्या सुरक्षा व अधिकारांचे संरक्षण करण्यात यशस्वी होण्यासाठी प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे, स्थानिक प्रशासनाने तात्काळ योग्य निर्णय घेऊन नागरिकांच्या संवेदनशीलतेचा आदर करणे आवश्यक ठरते.