त्रयस्थ व्यक्ती तडजोडीने झालेला हुकूमनामा रद्द करण्यासाठी स्वतंत्र दावा दाखल करू शकते, उच्च न्यायालायचे औरंगाबाद खांडापीठाचा निर्वाडा.
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
अहमदनगर येथील मोबीन खान यांनी अमरसिंह भट्टल या व्यक्तीकडून एका जमिनीबाबत साठेखत करून घेतले होते. परंतु त्यानंतर त्यांना हे लक्षात आले की, अमरसिंह भट्टल यांनी एकाच जमिनीबाबत दोन व्यक्तींसोबत साठेखत करारनामा केलेला आहे.
सदरील जमिनीचा खरेदीखताबाबत व्यवहार पूर्ण न केल्यामुळे मोबीन खान यांनी अमरसिंह भट्टल यांच्या विरोधात सदरील व्यवहार पूर्ण करावा यासाठी दावा दाखल केला होता. पण या दाव्यात प्रलंबित असताना, अमरसिंह भट्टल यांनी दुसऱ्या व्यक्ती जतींदर अबट यांच्यासोबत तडजोड करून सदरील वाद मिटवून त्या जमिनीची खरेदीखत त्यांच्याच नावे दिला.
हा प्रकरण मोबीन खान यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रलंबित दाव्यात सुधारणा करण्यासाठी अर्ज केला, ज्यामध्ये त्यांनी तडजोडीने झालेला हुकूमनामा रद्द करण्याची मागणी केली. दिवाणी न्यायालयाने या अर्जाला मान्यता दिली होती, परंतु त्याविरोधात जतींदर अबट यांनी माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सदरील प्रकरणात मोबीन खान यांच्या वतीने एडवोकेट निलेश भागवत यांनी केलेला युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आणि याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाने स्पष्ट केले की, “दाव्यातील सदरील सुधारणा ही दाव्याचं मूळ स्वरूप बदलत नाही.” जेव्हा त्रयस्थ व्यक्तीला तडजोडीने झालेला हुकूमनामा रद्द करण्याची आवश्यकता भासेल, तेव्हा स्वतंत्र दावा दाखल करण्याचा अधिकार आहे किंवा प्रलंबित असलेल्या दाव्यात सुधारणा करून तशी मागणी करता येऊ शकते, असं निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणी मोबीन खान यांच्या वतीने एडवोकेट निलेश भागवत यांनी काम बघितले असून, त्यांना संकेत कुंजीर व भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले.
समाजामध्ये न्याय मिळवायला लागणाऱ्या संघर्षाची एक वेगळी गाथा उभी राहते, ज्यामध्ये न्यायिक प्रणाली कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणारी ठरते.