महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्षपदी खंडेराव कडलग यांची बिनविरोध निवड
शिरपुर : महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळचे राज्यस्तरीय महाअधिवेशन नुकतेच साईबाबा यांच्या पुण्यभूमी शिर्डी येथे महाराष्ट्रातील येथून सुमारे ६ हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्षपदी खंडेराव आनंदराव कडलग रा. शिर्डी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला तर यावेळी मान्यवरांचा हस्ते खंडेराव कडलग यांचा हस्ते करण्यात आला. व मावळते प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यश खंडेराव कडलग यांचाकडे प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे दिलीत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील सुदर्शन न्यूज चॅनल अध्यक्ष सुरेश चव्हाणके होते. तर प्रमुख मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्रसेठ आहेर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, हरियाणाचे अमित खत्री, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, प्रदेशाध्यक्ष निवड समिती अध्यक्ष मुरलीधर शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. सिमा रंधे, कार्याध्यक्ष सौ. सुषमाताई अमृतकर, माजी युवा प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, युवा प्रदेशाध्यक्ष रवी राऊत, तुषार रंधे, लॉन्ड्री संघटना प्रदेशाध्यक्ष सुनील दळवी, कार्याध्यक्ष श्रीरंग मोरे, नामदेव वाघमारे, तंटामुक्ती समिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, सुधीर खैरनार, उपाध्यक्ष प्रा. सदाशिव ठाकरे, महासचिव रामदास शिंदे, संतोष सवतीरकर, बळवंतराव साळुंखे, शांतीलाल कारंडे, मनोज यादव, किरण बांदेकर, श्रीमती विमलताई खंडाळे सौ. वैशाली राऊत, सौ. कल्पना गायकवाड आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत निवड समिती अध्यक्ष मुरलीधर शिंदे व प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार यांनी २०२५ पासूनचे महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे बिनविरोध प्रदेशाध्यक्ष म्हणून खंडेराव आनंदराव कडलग यांची निवड फटाक्याच्या आतिषबाजीत व समाज बांधवांच्या टाळ्यांच्या गजरात धूमधडाक्यात करण्यात आली. महाअधिवेशन यशस्वीतेसाठी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील फंड, संजय जगताप, गोविंद राऊत, दीपक पवार, गोरख राऊत, किशोर गवळी, दत्ता हजारे, गौरव जाधव, रवींद्र राऊत, राजेंद्र फंड, अनिल देसाई, सुधाकर वाघ, सुनील निकम, अंबादास राऊत, संतोष जाधव, पोपटराव शिंदे, शिवा राजगिरे, दिगंबर देसाई, रितेश राऊत, प्रसाद निकम, अनिल देसाई, मनोज बर्वे, मयूर शिरसाट, मिलिंद कडलग, सारिका फंड, शीतल शिंदे, लता दळवी, नमिता भागवत, कावेरी राऊत, सुनंदा कडलक, चित्रा राऊत, अनिता हजारे, मोनिका राऊत व अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतलेत.