भोकरदन ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समिती स्थापन ।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील। भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णकल्याण समिती स्थापन करण्यात आली असुन जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेद्रं शिवाजीराव पाटील यांची अध्यक्षपदी तर सह अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी श्री अरुण एम.यांची निवड करण्यात आली आहे तर खालील सदस्य यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.आमदार संतोष दानवे यांनी लोकनियुक्त सदस्य पदी डॉ.चंद्रकांत साबळे, डॉ.राजेद्रं ताठे, रणवीर सिंह देशमुख जाधव यांना आमदार प्रतिनिधी सभापती, सदस्य पदी नियुक्ती आ.संतोष दानवे यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.सदस्यपदी डॉ.चंदेल तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी जारवाल , डॉ.वानखेडे अधिक्षक यांची सचीव पदी, तहसीलदार संतोष बनकर सदस्य, गट शिक्षणाधिकारी शहागडकर यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.