शिरपूरहून निघालेल्या ओव्हरलोड वाळूच्या डंपरवर अमळनेर पोलिस पथकाची कारवाई…
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
अमळनेर : शिरपूरहून निघालेल्या ओव्हरलोड वाळूच्या डंपरवर अमळनेर पोलिस पथकाची कारवाई, 8 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल…
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमळनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील , अमोल कर्डीकर ,नितीन कापडणे,पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे आदींच्या पथकाने गलवाडे गावाजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा रचला असता शिरपूर येथील लोंढरे येथून पाच ब्रास अवैद्य वाळूची वाहतूक करणारे MH 19 CY 2729 क्रमांकाचे डंपर आढळून आले असून पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले. वाहन चालक संतोष नाना बैसाणे रा.हिंगोणे ता.अमळनेर यांच्यावर भादवी कलम 303(2), 48(7), 48(8) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करत आहेत.