बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला महाआरोग्य व कॅन्सर निदान शिबिर यशस्वी पार पडले..
बारामती/वर्षा चव्हाण
बारामती मध्ये ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क व एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO) तसेच विविध शासकीय आरोग्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाआरोग्य व कॅन्सर निदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
खासदार व बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १५००+ महिलांसाठी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यातील ८१० महिलांची आज तपासणी करण्यात आली असून उर्वरित महिलांची तपासणी दि.9 मार्च रोजी सुरू राहील.
कार्यक्रमात सुनेत्रा वहिनी पवार यांनी महिलांना मार्गदर्शन करताना, महिलांचे आरोग्य हे त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भक्कम पायाचा आधार आहे, असे सांगितले. तसेच, महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
🟣महत्त्वाचे आरोग्य निष्कर्ष:
✅ कॅन्सर सदृश लक्षणे आढळलेले रुग्ण: पुढील तपासणीसाठी शिफारस.
✅ थायरॉईडच्या समस्यांचे निदान: काही महिलांमध्ये निदान होऊन पुढील उपचार सुरू.
✅ शुगरच्या तपासणीमध्ये अनियमितता आढळलेल्या महिला: मधुमेह नियंत्रणासाठी वैद्यकीय सल्ला.
✅ इतर आजार: हृदयविकार, रक्तदाब, पोषणदोष याबाबत तपासणी व सल्ला.
🟤आरोग्य तपासणी व सहभागी संस्था:
शिबिरात महिलांसाठी CBC, थायरॉईड, शुगर, पॅपस्मिअर आणि थरमॅमोग्राफी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, तालुका आरोग्य विभाग, महिला शासकीय रुग्णालय, सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय, हेल्थ विकिन रिच फाऊंडेशन, साईधान कॅन्सर हॉस्पिटल, मेहता हॉस्पिटल, व हिंद लॅब या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
⚫विशेष मार्गदर्शन:
डॉ. चकोर व्होरा (DM – ऑन्कोलॉजी, वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट) यांनी कॅन्सर निदान व त्यासंबंधी गैरसमज यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राकेश मेहता यांनी केले. तसेच, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यमपल्ली, मेडिकल कॉलेज बारामतीचे डीन डॉ. मस्के, डॉ. भोई, डॉ. जगताप, डॉ. खोमणे, डॉ. शेख, डॉ. खलाटे, श्री मुसळे साहेब, श्री हणमंत पाटील MIDC RO, श्री यादव सर, श्री मुळीक सर, श्री हाटे सर, एन्व्हार्यमेंटल फोरमचे सदस्य, टेक्सटाईल पार्कच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
हे शिबिर महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून भविष्यात असेच उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प करण्यात आला.