मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे “स्त्री”!
दिनांक: 08/032025
पिंपरी बुद्रुक:
प्रतिनिधी समाधान रजपूत.
महिला दिनानिमित्त समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य माणून
स्वतःच्या ह्रदयावर मोठी शस्ञक्रिया होऊन देखील नडगमगता ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पंचक्रोशीतील मुलांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण दिले व उत्कृष्ट अशी पिढी घडवली अशा तेजस्विनी राने मॅडम यांचा सन्मान केला.
तसेच 24 तास रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील नर्स व महिला सफाई कामगार यांचा,भाजपा ओबीसी मोर्चा पुणेजिल्हा पदाधिकाऱ्यांनी यांनी साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा
श्री गजानन वाकसे, भाजपाचे तालूका सरचिटणीस राजू जठार,चंदू शेंडे,अक्षय चव्हाण,सौरभ क्षीरसागर,पांडुरंग सुळ,राहुल ननवरे,दिपक रुपनवर,सतीश सलगर,तुकाराम वाडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्व माता आणि भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.