राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेण्याचे शिक्षण विभागाचे आदेश..
मार्मिक न्यूज नेटवर्क: विक्की जाधव
राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाने थेट वेळापत्रक जाहीर केले असून, परीक्षा 8 एप्रिल पासून सुरू होऊन 25 एप्रिल पर्यंत संपणार आहेत. यांनतर, या परीक्षेचा निकाल 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी लावण्यात येणार आहे, आणि 2 मे पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी मिळेल.परंतु, शिक्षण विभागाचे हे अचानक आदेश देण्यात आल्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर आणि शिक्षकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
योजना आणि उद्देश:
शिक्षण विभागाने काढलेला हा आदेश सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू होणार आहे, त्यामुळे सर्व शाळांना या कालावधीत परीक्षा घ्यावी लागणार आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले गेले आहे की, “प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वेग वेगळा असतो. त्यानुसार त्यांना मूलभूत संकल्पना नीट समजून घेण्यासाठी अधिक वेळ मिळावा लागतो.” उदाहरणार्थ, वाचन आणि गणित या विषयांची योग्य तयारी करण्यास विद्यार्थ्यांना संधी मिळेल, जो त्यांच्या शैक्षणिक यशासाठी महत्त्वाचा आहे.
सुट्ट्या कमी करून देखील शाळा चालू राहिल्या तरी मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते. शिक्षण विभागाने या मुद्द्याला सामोरे जात, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात त्या त्या आधीचा पुरेपूर कालावधी मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
फक्त एकाचवेळी परीक्षा घेणे ही पद्धत विद्यार्थ्यांसाठी कीती उपयुक्त आहे यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत गृहीत धरून यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि ताण कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयाची अंमलबजावणी केलीचं जाईल पण शाळांना येणारी आव्हाने यांचे परीक्षण करणे हे ही महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल राहील यासाठी सर्व स्तरांवर तयारी केली पाहिजे.