March 28, 2025 12:15 pm

आमदार भास्कर जाधव विरोधी पक्ष नेते झाले : अतिशय सुखद घटना !

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेना व महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाला एकुण संख्येच्या १० टक्के पेक्षा अधिक जागा न मिळाल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळण्यास अडसर निर्माण झाला होता. विधानसभा निवडणूकीच्या इतिहासातील ही अपवादात्मक बाब होती. विरोधी पक्ष नेते पदाबाबत अश्या परिस्थितीत काय करावे ? याबाबत स्पष्टता नव्हती.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सर्वाधिक जागा (२०) मिळाल्याने नैसर्गिक न्याय तत्वाने शिवसेना पक्षालाच विरोधी पक्ष नेते पद मिळणे अपेक्षित होते. परंतू १० % आमदार निवडून येणे आवश्यक असल्याचे म्हटले जात होते तरी त्यास कोणताही संवैधानिक आधार नव्हता किंबहूना संदिग्धता होती.त्यामुळे शिवसेनेच्यावतीने “विरोधी पक्ष नेते पदाबाबत नेमकी काय तरतूद आहे? या बाबत लेखी विचारणा नोव्हेंबर महिन्यातच करण्यात आली होती.

सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेता असणे आवश्यक असते. गेल्या ३ महिन्यातील मंथना नंतर विरोधी पक्ष नेत्याबाबत अनुकूल प्रतिसाद लाभला. तरी देखील मित्र पक्ष कॉंन्ग्रेसने या पदावर दावा सांगून पेच निर्माण केला होता. विरोधी पक्ष नेते पदासाठी ३ नावे चर्चेत होती.भास्कर जाधव, आदित्य ठाकरे व सुनिल प्रभू ही ती तीन नावे होती. चर्चेला उधाण आले असताना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना अपेक्षित असलेल्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करून यशस्वी चाल खेळली.

भास्कर जाधव हे शिवसेनेचे कोंकण विभागातून निवडणून आलेले एकमेव आमदार.त्यांची आक्रमक व धडाकेबाज वृत्ती मुळे ते प्रचंड लोकप्रिय होते. कोंकणातील हा एकमेव आमदार फोडण्याचे मनसुबे विरोधकांनी रचले होते. या मनसुब्यांना सुरूंग लावण्याचे काम भास्कर जाधव यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याने झाले. भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यक्षमते इतका न्याय न मिळाल्याबद्धल खंत व्यक्त केली होती. परंतू ते अतिशय प्रतिकूल काळात शिवसेनेशी एकनिष्ठ राहीले.शिंदे असो वा भाजप यांच्यावर ते विधानसभा व बाहेरही घणाघाती प्रहार करीत असत.परवा ठाण्यातील सभेत तर त्यांनी शिंदेंची लायकीच काढली व अब्रूची लक्तरे त्यांच्याच बालेकिल्यात चव्हाट्यावर मांडली.

विधानसभा कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव व आक्रमक भाषाशैली यामुळे संख्याबळ कमी असले तरी सत्ताधारी पक्षाची भंबेरी उडविण्याची क्षमता भास्कर जाधव यांच्यात आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या पहिल्या पसंतीचे नाव भास्कर जाधव हेच होते.मी ही त्यांच्याच नावास पसंती दिली होती. त्यामुळे भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदी झालेली निवड सुखद आहे. शिवसेना सत्तेत नसतानाही शिवसेनेस दोन लाल दिवे लाभले.एक अंबादास दानवे व दुसरे भास्कर जाधव हे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून दोन लाल दिव्याच्या गाड्यांतून दिमाखात मिरवणार !ही शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब आहे.भास्करराव जाधव यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन !

– दिलीप मालवणकर

९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!