शिरपूर : शिरपूर बालविकास प्रकल्प अधिकारी तथा नाशिक बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे यांना उत्कृष्ट बाल विकास प्रकल्प अधिकारी, ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकतेय सन्मानीत करण्यात आले म्हणून त्यांचा ठाणे येथील कृती समितीचे शिरपूर तालुकाध्यक्ष जयश्री देवरे व सचिव सुनिता सगरे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ह्या प्रसंगी भास्करराव शिंदे ,सेवानिवृत्त शिक्षिका सुशिलाबाई शिंदे, सौ.पुनम एस. शिंदे, शिरपूर बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पी.सी.पाटील, बोराडी बीट पर्यवेक्षिका कांता पवार, वकवाड बीट पर्यवेक्षिका रंजना पावरा,पंचायत समितीचे माजी सभापती जयश्री देवरे, बाल संरक्षण समितीचे सचिव सुनिता सगरे, अंबादास सगरे,ग्रामपंचायत अधिकारी गायत्री देवरे, यांच्यासह शिरपूर बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत सर्व पर्यवेक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
मुंबईतील अली चाइल्डहुड असोसिएशन (ईसीए) ही एक आंतराष्ट्रीय संस्था आहे जी लहान वयातील मुलांच्या बालपणीच्या शिक्षणासाठी काम करते. सदर मनस्वी खुप खुप उत्कृष्ट काम करण्याच्या शासकिय वाटचालीत् या वर्षाचा पुरस्कार धुळे विभागात उत्कृष्ट काम करणारे सचिन शिंदे यांना २०२५ वा वर्षाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मुंबई येथे भव्य कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे. सचिन शिंदे ह्यांनी बालकांसाठी व महिलांसाठी २०१७पासून महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (कळवण व शिरपूर), गट विकास अधिकारी (शिरपुर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि प पुळे), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ध) अशा विविध पदांवर कार्यरत असलेले व आपला कार्यभार प्रामाणिकपणे सांभाळणारे व प्रशासनावर उत्तम पकड असलेले सचिन भास्करराव शिदे ह्यांना उत्कृष्ट बाल विकास प्रकल्प अधिकारी, ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकतेय सन्मानीत करण्यात आले.