सुरंगली येथे डिजे न लावता टाळ मृदंग च्या गजरात पालखी मधुन छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक महीला आणि तरुणांनाचा उस्फुर्त सहभाग ।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील। भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी टाळ मृदंग च्या गजरात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन डिजे न लावता पालखी त छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली महीला नी फुगडी खेळत.तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी घ्या घोषणा देत परीसर दणानून सोडला. नंतर शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली .