June 30, 2025 9:28 am

स्व. आर.आर.आबा पाटील आरोग्य वर्धिनी योजना लाभदायी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

महादेव माळी,मार्मिक समाचार, हिंगणगांव: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.आबा पाटील यांनी आयुष्यात फक्त सामान्य माणसाची चिंता वाहिली. अवघा महाराष्ट्र पोरका झाला. आबांनी फक्त मंत्रीपदे भुषविली नाहीत तर त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे दिवस आणले. आबा म्हणजे सामान्यांचे आधारवड होते. त्यांच्या अकाली निधनाने हतबल झालेल्या जनतेला आधार देण्याचे महत्त्वाचे काम आ.सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी केले. अगदीच पोरसवदा असणाऱ्या रोहित पाटील यांनी सर्वस्व पणाला लावून स्वतःला झोकून देऊन काम सुरू केले आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ आता कुठे दु:खातून सावरायला लागला आहे. असे म्हणायला हरकत नाही. रोहित पाटील यांचे वय हे समजून घेण्याचे नाही तरीही तो आबांचा बछडा आहे हे सिद्ध करत आहे. रात्रंदिवस तो राबतो आहे, लोकांना समजून घेतो आहे आणि सरळ त्यांच्या प्रश्नाला भिडतो आहे. कामाचा निपटारा करतो आहे. आबांच्या निधनानंतर रोहित वियोग करत बसला नाही तर तो जनतेचे दु:ख तेच आपले दु:ख मानून जनतेमध्ये राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पराकाष्ठा करतो आहे. शासकीय पातळीवर सर्व योजना राबवत असताना लोकांच्या वैयक्तिक समस्येवर तोडगा काढतो आहे. लोक समाधान व्यक्त करत आहेत कारण रोहित पाटील यांना भेटल्यानंतर लोकांना आबांना भेटल्याचा आनंद मिळतो आहे. म्हणून रोहित पाटील यांच्या एक लक्षात आले की लोक आजारी पडतात, दवाखान्यात लाखो रुपये खर्च करतो. सामान्य माणूस आजारापेक्षा येणाऱ्या खर्चाला बघून खचतात आणि मानसिक तणावाने बळी ठरतात! आख्खं कुटुंब उघड्यावर पडतं हे विदारक चित्र पाहून तो बेचैन झाला. यासाठी आपण कांहीतरी भरीव करायला हवं याचा ध्यास त्यांनी घेतला. कारण आबांनी सत्तेत असताना अनेक रुग्णांना जीवदान दिले होते. डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया, ह्रदय रोग शस्त्रक्रिया, मुत्ररोग शस्त्रक्रिया, महिलांचे असाध्य रोग यावर आबांनी लक्ष केंद्रित केले होते. आबांच्या विचारांचा वारसा चालवायचा असेल तर आबांनी सुरू केलेली लोकोपयोगी कामे सुरुच रहायला हवीत. म्हणून रोहित पाटील यांनी स्व. आर.आर.पाटील युवा प्रतिष्ठान या नावाने राज्य पातळीवरील संस्था स्थापन केली आणि या संस्थेचे टाय अप मिरज येथील सिनर्जी हाँस्पिटल, मिरज यांच्याशी केले. आजपर्यंत शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. मला वाटते या कामाला तोड नाही! हे सर्व लक्षात घेऊन रोहित पाटील यांनी स्व. आर. आर.आबा पाटील आरोग्य वर्धिनी योजना सुरू केली आहे तीही सिनर्जी हाँस्पिटल,मिरज यांच्या सहकार्याने!या योजनेंतर्गत मोफत ह्रदय रोग तपासणी आयोजित केली आहे, या तपासणी मध्ये अँजोग्राफी, अँजिओप्लास्टी, ह्रदय शस्त्रक्रिया होणार आहेत त्याही आपल्या मिरच्या सिनर्जी हाँस्पिटल मध्ये!या तपासण्या दि.१९ ते २७ फेब्रुवारी,२०२२ या काळात स.९.०० ते सायं.५.०० या वेळेत होणार आहेत. यासाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री अभिषेक पाटील — मो.नं.8600882277 यांची नेमणूक केली आहे. आपल्या मतदारसंघात एकही रुग्ण पिडीत राहू नये, सर्व जनतेचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, जास्तीत जास्त जनतेने याचा लाभ घ्यावा! असे आवाहन युवा नेते रोहित दादा पाटील यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!