July 1, 2025 4:20 am

सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका अशा संदेश देणारे संत गाडगे बाबा : प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : संत गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्या मधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका अशा संदेश देणारे या थोर महापुरुषाचा जन्म दि. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रात झाला होता त्यांना जयंती निमित्त आदरांजली वाहतो असे सांगितले.

असे प्रतिपादन महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी केले. येथील परिट (धोबी) सेवा मंडळातर्फे शहरातील श्रीसंत गाडगे बाबा उद्यान श्री नगर काॅलनी येथे संत गाडगे बाबा यांची (दि.२३ फेब्रुवारी) रोजी १४६ वी जयंती निमित्त त्यांचा पुतळ्यास अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, धुळे जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, श्रीमती आशाताई रंधे यांचा हस्ते मार्ल्यापण करुन विनम्र अभिवादन कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे होते. यावेळी व्यासपीठावर धुळे जिल्हा ग.स बॅन्क गटनेते निशांत रंधे,, प्रा. डाॅ. रजनी लुंगसे, उद्योजक अशोक बेडीस्कर, व्हि. व्हि. दिघे, सुरेश कुवर, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे आदि उपस्थित होते. ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सदाशिव ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान वाघ, वसंत सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, उपाध्यक्ष उमेश खैरनार, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, युवक शहराध्यक्ष योगेश सैंदाणे, सुनिल सुर्यवंशी, राजेंद्र येशी, मोहन बोरसे, मोहन येशी, अनिल बोरसे, रतिलाल वाल्हे, संजय येशी, धनराज पवार, रविंद्र वाघ, नरेश पवार, हर्षवर्धन बोरसे, अविनाश पवार, नामदेव बोरसे, जितेंद्र जाधव, जितेंद्र बोरसे, दिनेश जाधव, गोलु सैंदाणे, कुणाल जाधव, राज बोरसे आदि समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!