July 1, 2025 6:59 am

मच्छिमारांची चोरलेली बोटीचा शोध अवघ्या 15 तासात लावला छडा,830200 रुपये किमतीचा मुद्देमाल सहित आरोपी केले गजआड;भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

मच्छिमारांची चोरलेली बोटीचा शोध अवघ्या 15 तासात लावला छडा,830200 रुपये किमतीचा मुद्देमाल सहित आरोपी केले गजआड;भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी

(निलेश गायकवाड)

भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, मासेमारी करणारे मच्छीमार यांना दिलासा, मच्छीमार यांच्या चोरीस गेलेल्या ४ बोट इंजिन व १ लोखंडी बोट असे चोरी करणारे अटल गुन्हेगार १५ तासाचे आतमध्ये जेरबंद करून त्यांचेकडुन चोरीस गेलेला मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेली साधणे असा एकुण ८,३०,२००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगस्त…

दिनांक. २६/०१/२०२५ रोजी १९:३० वा ते दिनांक २७/०१/२०२५ रोजी सकाळी ०५:३० वा चे दम्यान मौजे कुंभारगाव, धुमाळवाडी, ता.इंदापुर, जि.पुणे गावचे हददीतुन भिमा नदीचे पत्रामध्ये फिर्यादी नामे श्री. अनिल नामदेव धुमाळ, रा. कुंभारगाव, ता. इंदापुर, जि.पुणे यांचे मालकिची मासेमारी करण्यासाठी वापरणारी होंडा कंपनीची ५एच.पी १६० सी.सी बोट इंजीन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून चोरी केली . सदर घटनेची फिर्याद भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा. रजि. नंबर. ४४/२०२५, भारतीय न्याय संहीता सन. २०२३ चे कलम.३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली.

सदरचा गुन्हयाची माहीती मिळताच गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन स्थानिक मासेमारी करणारे मच्छीमार यांना दिलासा देण्याचे दुष्ट्रीने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक, यांनी तात्काळ तपास टिम तयार करून अज्ञात चोरटे यांचा शोध घेणेकामी मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना देवुन रवाना केले. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचा सी.सी .टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांचे मार्फतीने माहीती काढुन आरोपी नामे १) दत्तु हिरामन घटे, वय. ३८वर्ष, २) रमेश हिरामन गव्हाणे, वय ३७ वर्ष, दोघे रा. वरखडे, ता. नेवासा, जि. अहील्यानगर यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. व गुन्हयातील चोरीस गेलेला मुदद्देमाल काढुन दिला. तसेच त्यांचेकडे अधिक विचापुस करता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली.सदर कामगिरीचे सर्व स्थरातून भिगवण पोलिसांचे कौतुक होत आहे.सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या ४ बोट इंजिन व एक लोखंडी बोट व साधणे असा एकुण ८,३०,२००/- रू किंमतीचा मुदद्देमाल आरोपी यांचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.पंकज देखमुख साो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा.डॉ सुदर्शन राठोड साो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दै, पोलीस अंमलदार विठल वारगड, पांडुरंग गोरवे, सुभाष गायकवाड, प्रसाद पवार, सचिन पवार, रणजित मुळीक, यांनी केली आहे.

गुन्हयांचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठठ्ल वारगड, सहा. पो. फौजदार हे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!