रा से योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव
प्रताप महाविद्यालय, अमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फॉर माय भारत व डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ दि. २७ जानेवारी रोजी चिमणपुरी पिंपळे येथे उत्साहात पार पडला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२५ स्वयंसेवकांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीची अनुभूती मिळाली.
समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निंबा दला चौधरी (अध्यक्ष, दत्त मंदिर संस्थान, चिमणपुरी पिंपळे), युवराज दगा पाटील (उपसरपंच),राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हेमंत पवार यांनी शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला, ज्यात विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री जाधव यांनी केले.
सात दिवसांच्या या शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. मतदान जनजागृती मोहिमेद्वारे ग्रामस्थांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. “पेड माँ के नाम” या उपक्रमातून वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. मधुमेह तपासणी शिबिर व डॉ. विक्रांत पाटील यांच्या व्याख्यानातून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तसेच सहज योग आणि ध्यान सत्राच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर देण्यात आला. श्रमदानाच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली, ज्यामुळे समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित झाले. या शिबिरासाठी प्रा. डॉ. सचिन नांद्रे राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले.