June 28, 2025 8:00 pm

सांगवी आरोग्य केंद्र की वसूली केंद्र ! कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी मागितले जातात पैसे

अपनी भाषा में पढ़े! Translate

सांगवी आरोग्य केंद्र की वसूली केंद्र ! कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी मागितले जातात पैसे

वंचित बहुजन आघाडीने दिले तालुका आरोग्य अधिकारींना निवेदन..

शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र वसुली केंद्र झाले की काय

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) सांगवी प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रात जानेवारी महिन्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलांकडून ५०० ते १००० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक बाप उघड झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शासन कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यावर जोर देऊन रुग्णांना प्रोत्साहन करीत हम दो हमारे दो याबाबतचे नियोजन असते पण संबंधित अधिकारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलांकडून चक्क पैसे घेत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली असता तरीदेखील याबाबतची कुठली दखल न घेतल्यामुळे दि.२६ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


शासनाच्या ध्येयधोरणानुसार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या महिला किंवा पुरुषांना सहाशे रुपये भत्ता त्यांच्या बँक खात्यात अदा केला जातो. व रुग्णांना देण्याची व्यवस्था देखील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असते. असे असताना देखील शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या रुग्णांकडून पैसे मागणी कितपत योग्य असल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
शिरपूर तालुक्यातील व आदिवासी भागातील सांगवी प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येते या शिबिरात रुग्णांकडून चक्क पैसे घेऊन हे पैसे येणाऱ्या डॉक्टरांना दिले जातात असे रुग्णांना सांगितले जाते. तसेच शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना कुठल्याही प्रकारची जेवण देखील पुरवले जात नाही. रुग्णांना नातेवाईक घरून जेवण आणतात. तसेच कुठल्याही प्रकारची सुख सुविधा नसल्यामुळे नातेवाईकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन दोषींवर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी तालुका आरोग्य कार्यालयासमोर करणार तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
शिरपुर तालुक्यातील सांगवी आरोग्य वर्धनी केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनकडुन शस्त्रक्रियेचे ५०० ते १००० रुपये संबंधित रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले असा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनकडुन समजल्याने व त्या रुग्णालयात भेट देत रुग्ण व नातेवाईक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला व आमच्याकडुन पैशांची मागणी करण्यात आली असे सांगितले..
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली पण आजपावतो संबंधितावर कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने आज दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत मागणी करण्यात आली कि संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे या निवेदनात म्हणण्यात आला आहे.
सांगवी प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रात अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष त्या जगेवर असल्याने ते कर्मचारी आपला मनमानी कारभार सुरू ठेवतात याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी सतत दुर्लक्ष केले आहे. तसेच या केंद्रावर विविध समित्यांचे देखील स्थापना करण्यात आली आहे पण त्या समित्या फक्त कागदावरच असल्याचे रुग्णव नातेकांनी म्हटले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!