ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब ता. इंदापूर जि. पुणे संचलित, वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज चे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत नेत्र दीपक यश…
वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेजने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई. यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, एलिमेंटरी परीक्षेत एकूण 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ‘अ’ श्रेणीमध्ये 1. ‘ब’ श्रेणीमध्ये 13 विद्यार्थी. ‘क’ श्रेणीमध्ये 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इंटरमिजिएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीत 1. ‘ब’ श्रेणीत 3. ‘क’ श्रेणीत 17. असे एकूण 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. सुरेश अर्जुन सर. व पर्यवेक्षक श्री. आळंद सर यांनी दिली.
विद्यालयातून एलिमेंटरी परीक्षेत अश्रिनी मधून कुमारी दिपाली कल्याण राऊत हिने यश संपादन केले.
तर अनुष्का सदाशिव मकर, अपेक्षा सचिन वनवे, रुचिता गणेश राऊत, राधिका अनिल जाधव, यशवंती अजित खरात, अनुष्का तानाजी वरुडकर, ईश्वरी दादा जाधव, मनीषा संतोष कुंभार, रितेश राजेंद्र कांबळे, करण बापूराव डोंबाळे, श्रावणी संदीप दळवी, सोहम तात्यासाहेब घाटे, या विद्यार्थ्यांनी ब श्रेणी प्राप्त केली.
तसेच वैष्णवी आप्पा करे, प्रियंका ज्ञानदेव करे, व अनिशा दत्तात्रय जाधव, माझी अमोल डोंबाळे यांनी क श्रेणी प्राप्त केली.
इंटरमिजिएट परीक्षेत विद्यालयातील कीर्ती संदीप मारकड हिने अ श्रेणी प्राप्त केली तर ईशा सुरेश काशीद, श्रावणी विशाल जगताप, सायली राहुल मोहिते, सायली संतोष गोरे विद्यार्थिनींनी ब श्रेणी प्राप्त केली.
तसेच जोया अकबर शेख, गायत्री आनंद घाडगे, दिव्या धनाजी तुपे, स्वरांजली अनिल तुपे, अमृता महादेव तुपे, प्रतीक्षा सागर भोकरे, जयकुमार राजू कवळे, अरमान नियाजुद्दीन काझी, शिवराज उत्तम जाधव, अंजनी पांडुरंग लोखंडे, अथर्व महादेव मोहिते, आकांक्षा बिरादार, अथर्व अभंग, अथर्व पोळ, कृष्णा नाळे, दुर्गा संतोष कुंभार, अनिसा हबीब जमादार, या सर्व विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री. सुरेश चिमाजी काशीद सर यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामचंद्र कदम, उपाध्यक्ष मा.श्री. मधुकर पाटील, प्राचार्य श्री. सुरेश अर्जुन सर, पर्यवेक्षक श्री. इब्राहिम आळंद सर यांनी अभिनंदन केले.