सतत चे अपघात होत असल्याने धुळे एरंडोल राज्यमार्ग 39 वर उड्डाणपूल उभारण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक यांच्या कडे मागणी..
अमळनेर : विक्की जाधव.
सुरत-धुळे-पारोळा-एरंडोल- जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग पारोळा तालुक्यातून जातो. तर धरणगाव कडून राजवडमार्गे जातांना ह्या राज्यमार्गास मिळत असतो.या क्रॉसिंग कर नेहमी वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. सदर ठिकाणी एकाच समपातळीत रस्ता क्रॉसिंग असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकहे रस्ता क्रॉसिंग करतांना समोरून येणाऱ्या वाहनाचा वेगाचा अंदाज येत नसल्याने नेहमी अपघात होतात. त्यामुळे मोठ्याप्रमाणात जीवित व वित्त हानी होत असते. तसेच बऱ्याच लोकांना कायम अपगंत्व आलेले आहे.त्यामुळे सदर अपघात स्थळाची सुधारणा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 39 वर 21/400 या मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याबाबत कारवाही प्रस्तावित करावी होण्याची आवश्यकता असल्याने आपल्या स्तरावरून उचित कारवाई होण्याची मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे केली आहे.