June 29, 2025 9:27 pm

स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन..

 

अमळनेर : विक्की जाधव 

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA), अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC),आणि करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC)यांच्या संयुक्त विद्यमाने 15 दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सचे उद्घाटन आज पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी 10:30 वाजता संपन्न झाले.

यावेळी युनिक अकॅडमी,पुणे यांच्या माध्यमातून 15 दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्स आयोजित केले आहे.

दि.16 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान संघ लोकसेवा आयोग(UPSC),महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC),कँबाईड परीक्षा,बँकिंग परीक्षा,रेल्वे परीक्षा, पोलीस भरती,UPSC सिसॅट याच प्रमाणे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेतील विविध टप्पे,मुख्य परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम यांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने पंधरा दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्स उपयुक्त असणार आहे.सदर कोर्सचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी केले. सुरुवातीस पूज्य साने गुरुजी, माता सरस्वती देवी,कर्मयोगी-कर्मयोगी-श्रीमंत- दानशूर प्रताप शेठजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी विचार मंचावर युनिक अकॅडमीचे मार्गदर्शक श्री अंकुश देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील, कोर्सचे समन्वयक डॉ.जे.बी.पाटील, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, युनिक अकॅडमीचे माननीय नरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

अध्यक्षीय व उद्घाटन पर भाषणात प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की,यूपीएससी ही परीक्षा कठीण असली तरी नियोजनबद्ध अभ्यासातून आपण यूपीएससी परीक्षांना सामोरे गेले पाहिजे.अश्या शुभेच्छा दिल्या.यावेळी विविध विद्याशाखेचे 200 विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी युनिक अकॅडेमीने स्टडी मटेरियल दिले.सदर उपक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव, रुसाचे समन्वयक डॉ.मुकेश भोळे,डॉ.अमित पाटील यांनी सुद्धा सहकार्य केले.

मार्गदर्शन अभ्यास कोर्सचे आभार समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!