June 29, 2025 4:19 am

रयत शिक्षण संस्थेचे,भैरवनाथ विद्यालय भिगवण ता.इंदापूर जि.पुणे विद्यालयाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इंटरमिजिएट परीक्षेचा 100% निकालाची परंपरा कायम…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

रयत शिक्षण संस्थेचे,भैरवनाथ विद्यालय भिगवण ता.इंदापूर जि.पुणे विद्यालयाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इंटरमिजिएट परीक्षेचा 100% निकालाची परंपरा कायम…..

विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024 -25 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या, कला संचालनालय मुंबई यांचे मार्फत रेखाकला परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 100% लागला असून एकूण 18 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये ए ग्रेड मिळवून कु.अस्मिता भगवान काळे,सुप्रिया लालासो बंडगर,गौरी भाऊसाहेब सोनवणे, गायत्री विजय काजळे, तेजस्विनी संतोष दाभाडे, वैभवी सचिन भिसे व बी ग्रेड मिळवून ओम गोकुळ निकम, सुरज अशोक चौधरी, प्राची सुनील धुमाळ, साक्षी अतुल कांबळे, साक्षी गणेश सकुंडे, सारा मुबारक शेख, श्रुती उमेश कांबळे, श्रुतिका संतोष वाघ, स्नेहल पोपट कुंभार, सृष्टी संतोष झाकणे, व सी ग्रेड मिळवून कु.संस्कृती रवींद्र सकुंडे या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. एलिमेंट्री परीक्षेचा निकाल 100% लागला असून त्यात कु स्वेता विजय महामुनी, सिद्धी अनिल सातपुते यांना ए श्रेणी मिळाली असून बी श्रेणी मिळवून 17 विद्यार्थी व विद्यार्थीनी सी श्रेणी मिळवून 03 असे 23 विद्यार्थ्यांनी भरभरून यश मिळवले आहे.त्याबद्दल विद्यालयाचे कौतुक स्थानिक स्कूल कमिटी सर्व सदस्य,तसेच पालक वर्ग,विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री भोसले व्ही. बी. पर्यवेक्षिका सौ सोनवणे एस.व्ही. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री ज्ञानेश्वर राऊत व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!