महिलेचा विनयभंग, तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क
शहरातील पारोळा रस्त्यावरील पैलाड भागात राहणाऱ्या एका महिलेलां शेजारी राहणारयाणी मारहाण केल्याची माहिती मिळाली असून अमळनेर पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, शहरातील पैलाड भागात एक महिला आपल्या कुटुंबासोबत बसलेली होती. २५ तारखेला सकाळी ती तिच्या नातवाला अंगणात खेळवत असतांना, तिच्या घराजवळून धूर येत असल्याचे पाहून ती बोलली कीं कोणत्या नालायकणे धूर उडवला आहे. तिच्या या बोलण्यावर शेजारी राहणारे गुलाब भोई, कैलास भोई आणि रवींद्र भोई यानी शिव्या देत महिलेचा विनयभंग केला केला. तर महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेकॉ. गणेश पाटील हे करीत आहेत.
या घटनेने समाजात महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही आवश्यक आहे. समाजासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा असून, अशा घटनांचे पुनरावृत्तीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे.