पंचायत समिती अमळनेर: राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित कार्यक्रमास जबाबदार व्यक्तींचं गैरहजर
अमळनेर विक्की जाधव
अमळनेर पंचायत समिती राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित कार्यक्रमास जबाबदार व्यक्तींचं गैरहजर. आपल्या कार्यकर्तृत्वाची थोडीही जान नसणे म्हणजे ग्राहकांचे हक्क व अधिकार जपण्याच्या या उपक्रमाला असंतोषाची छाया मिळाली असावी. ग्राहक देवो भव यावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात खरोखरच ग्राहकांचे महत्त्व व ग्राहक विचारणारे मुद्दे समजावून सांगण्यात आले. वडिलोपार्जितपणे सुरु केलेल्या ग्राहक दिनाच्या उपक्रमानुसार, प्रत्येक डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांनी हजेरी लावणे गरजेचे होते. तरी, ठोक व्यापारी, शासकीय आणि निमशासकीय प्रतिनिधींची हजेरी गहाळ होती,राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संतोष पाटील, भारत जागृत मंचाचे अध्यक्ष, हीं उपस्थित होते. विशेषतः भारत गॅस, पेट्रोल पंप व विविध एजन्सींचे प्रतिनिधी देखील उपस्थित नव्हते.
यावेळी बोलताना संतोष पाटील यांनी आपल्या भाषणात ग्राहकांना योग्य मानसन्मान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी त्यांच्या भाषणात गोरगरीब ग्राहकांचे जीवन समृद्ध करण्यावर जोर देत, त्यांनी प्रशासनाचे लक्ष पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराकडे वळवले.
पण, पुरवठा अधिकारी शेख मॅडम यांच्या क्षेत्रात केवायसीच्या नावाखाली पैसे वसूल करण्याचा प्रयत्न आणि काही रेशन दुकानदारांकडून घेतले जाणारे मेहनताना याबद्दलची चिंता व्यक्त करताना पाटील यांनी समस्त शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या काही शासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले की, ग्राहकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात आवश्यक ती पावले उचलली जातील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भाऊ गोसावी यांनी केले.