मदनवाडी खंडोबापठारावर जाणाऱ्या पक्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ-सरपंच अश्विनी बंडगर
(निलेश गायकवाड)
श्रीक्षेत्र मदनवाडी खंडोबापठार,मल्हारीमार्तंड देवस्थान या ठिकाणी, आज रोजी सोमवार दि.23/I2/2024 रोजी, मदनवाडी गावच्या विद्यमान सरपंच सौ आश्विनीताई मारुती बंडगर यांच्या हस्ते खंडोबापठारावर जाणाऱ्या पक्क्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
त्यांच्या समवेत खंडोबापठारच्या मल्हारभक्त सौ. पूनमताई पद्माकर शिंदे यांनी ही विधीवत पूजा करून,
सरपंच सौ. आश्विनीताई मारुती बंडगर यांच्याकडे खंडोबापठार पासून ते तुळबाबा/धनबाबा मंदीरापर्यंत संपूर्ण पक्का काँक्रीट रस्ता करण्यात यावा….. त्याच बरोबर मंदीरासह खंडोबापठार व परीसर शुशोभीकरणाची मागणी करण्यात आली.
यानंतर विद्यमान सरपंचताई शुभप्रसंगी बोलत असताना त्या म्हणाल्या की कोणत्याही माध्यमातून मी खंडोबापठारसाठी निधी उपलद्ध करून देईल आणि खंडोबापठार देवस्थानची शोभा जास्तीत जास्त कशी वाढेल याच्या कडे मी स्वतः लक्ष देवून….. शुशोभीकरण, पाउलवाट, लाईट, झाडांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल,
या प्रसंगी इंजिनीयर- श्री नानासाहेब बंडगर, काँट्रॅक्टर खरात ,व त्यांचे कर्मचारी,आणि….. श्रीक्षेत्र मदनवाडी खंडोबापठारचे संस्थापक- श्री पद्माकर दशरथ शिंदे नाईक, हे सर्व उपस्थित होते.