स्नेहसंमेलनातून विदयार्थ्यांना आपल्यातील सुप्त कला गुण प्रकट करण्याची संधी-सरपंच अश्विनी बंडगर
-वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण संपन्न
(निलेश गायकवाड)
जय भवानी प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय वीरवाडी मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मदनवाडीच्या प्रथम नागरिक मा सौ अश्विनीताई बंडगर सरपंच होत्या तसेच उपसरपंच करिष्माताई सवाने, ग्रामपंचायत सदस्य संगीता कुदळे, शहाजी बंडगर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सीमाताई काळंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत( नाना) बंडगर पुनवडीचे सरपंच प्रतिनिधी हनुमंत शिंदे,सचिन बोगावत, संस्थेचे संस्थापक मारुतराव वनवे, भजनदास पवार, संस्थाध्यक्ष मारुती( नानासाहेब) बंडगर, संस्था सचिव अनिल तांबे, खजिनदार आप्पासो बंडगर, उपाध्यक्ष रामदास( तात्या) बंडगर, आबासो देवकाते संचालक कृषी उत्पन्न समिती इंदापूर ,आबासो बंडगर, संजय चव्हाण, तेजस देवकाते ,राजाभाऊ देवकते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र कोकरे राजेंद्र बंडगर, तुळशीराम खारतोडे ,शरद मल्लाव, दत्ता लोखंडे, बापू पवार, भागवत काळे, आजिनाथ सकुंडे, प्रमोदकुमार कुदळे तसेच पत्रकार नितीन चितळकर, महादेव बंडगर ,नानासाहेब मारकड ,संजय शिंदे, निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बंडगर मनोहर यांनी केले. प्रस्ताविकांमध्ये बंडगर सर यांनी शालेय जीवन हा आयुष्याचा पाया आहे. शालेय स्नेहसंमेलन च्या आठवणी कायम स्मरणात राहतात. शिक्षक व पालक हा मुलांच्या जीवनाचा पाया मजबूत करतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन घेत पुढे जावे असे आव्हान विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडगर सर यांनी केले. तसेच संस्था अध्यक्ष मारुती (नानासाहेब) बंडगर यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थी व पालकांनी मोबाईल पासून दूर राहावे. बालपणापासूनच आपले ध्येय निश्चित करावे. विविध महापुरुषांची चरित्र वाचावीत त्यामुळे शालेय जीवनापासून आपल्या मनावर विविध मूल्य रुजतात तसेच वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कला गुण प्रकट करण्याची संधी मिळत असते असे विद्यार्थी व पालकांना सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आंतरशालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत लावणे प्रबोधन पर नाटके विविध बहारदार नृत्य सादर करीत उपस्थित ची मने जिंकली. कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षक सुषमा ढवान ,छाया दडस, अंगद परदेशी ,मिलिंद करपे, अनिल कुंभार व शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप ढमे व सचिन कुंभार यांनी अथक परिश्रम घेतले.