भाजपा धुळे ग्रा. जिल्हा व महानगर सदस्यता नोंदणी अभियान दि. २४ रोजी धुळ्यात कार्यशाळा
धुळे : भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा मंगळवार दि २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेला आ. अनुप अग्रवाल यांचे कार्यालय (हॉटेल गणपती पाॅलेस समोर धुळे) येथे आहे. सदर कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावळ, माजी खा. डाॅ. सुभाष बाबा भामरे, माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, सदस्यता नोंदणी धुळे ग्रामिण प्रभारी आ. अनुपभैय्या अग्रवाल, सदस्यता नोंदणी धुळे महानगर प्रभारी आ. अमोल जावळे, आ. रामदादा भदाणे, आ. काशिराम दादा पावरा, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरतीताई देवरे, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, उत्तर महाराष्ट्र सदस्यता नोंदणी सहसंयोजक डाॅ. राधेश्याम चौधरी हे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यशाळेसाठी भाजपा प्रदेश पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, जिल्हा सदस्य नोंदणी अभियान समिती, प्रदेश, जिल्हा, मंडळ, विविध मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ठ अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी, माजी नगर सेवक, विविध बॅन्का, सोसायाट्या संचालक, मार्केट कमेटी संचालक व जिल्ह्यातील आजी, माजी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहान धुळे ग्रामिण भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सदस्यता नोंदणी जिल्हा संयोजक किशोर सिंगवी, महानगर सदस्यता नोंदणी संयोजक ओम खंडेलवाल यांनी केले आहे.अशी माहिती भाजपा धुळे जिल्हा प्रसिध्दी व मीडिया प्रमुख जितेंद्र बंब जैन यांनी प्रसिद्धी प्रत्रकाव्दारे प्रसिद्धीसाठी दिली.