अमळनेर शहरात मुख्य मार्गांवर भूमिगत गटारीच्या जाळ्यांची अवस्था खराब
कर वसुली करण्यात अग्रेसर असणारी पालिका सुविधा पुरवण्यात मागे का अमळनेरकरांचा प्रश्न?
अमळनेर : विक्की जाधव
येथील बस स्टॅन्ड ते चोपडा नाका दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी दरवाज्या जवळ व विविध ठिकाणी भूमिगत गटारीवर लावलेल्या जाळ्यांची अवस्था बिकट झाली आहे.अमळनेर शहरात येणारी सर्व वाहतूक येथूनच होत असते. त्या जाळ्यांना असलेले लोखंड तुटल्याने दररोज दोन ते तीन नागरिकांचा अपघात होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करावी तर तिथे कुणीही फोन उचलत नाही. फोन उचलला तरी ते काम आमचे नाही असे उत्तरे दिले जातात.तरी अमळनेर शहरात मुख्य मार्गावर असे खड्डे पडलेले असून जाळ्या तुटलेल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराने मोठा अपघात होऊन शकतो. बांधकाम विभाग व नगरपालिका यांनी लक्ष घालावे असे नागरिक बोलत आहेत. तर आमच्या देखरेखखाली रस्ता असून त्याच्यावरील गटारीचे सर्व कामे नगरपालिका प्रशासन करते,तरी आम्ही प्रशासनाशी बोलून दुरुस्ती करू….
सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर