तालुक्यात संघटन कौशल्यात माहीर असणारे तेजस देवकाते यांची तालुका भाजपा अध्यक्ष पदी निवड
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी तेजस एकनाथ देवकाते पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.याबाबतचे निवडीचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
तेजस देवकाते हे मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असून गेली दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत आहेत. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास भाजपमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष ते युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष असा झाला असून असून सध्या ते भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सचिव म्हणून कामकाज पाहत आहेत. संपूर्ण जिल्हाभर सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सौहार्दाचे संबंध,तरुण सहकाऱ्यांचे उत्तम मजबूत संघटन, कोणत्याही उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा एक उमदा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे मजबूत संघटन उभे करणे हे त्यांच्या समोरचे मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान ते कशा पद्धतीने पार पाडतात ते पाहणे महत्वाचे आहे.
चौकट – इंदापूर तालुक्यामध्ये बूथ अभियान प्रभावीपणे राबवून पक्ष संघटन मजबूत करून घराघरांमध्ये कमळ पोचवणे हे आगामी काळातील ध्येय असून या माध्यमातून तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मजबूत बांधणी करण्यास प्राधान्य राहील.
– श्री. तेजस देवकाते,अध्यक्ष भाजपा इंदापूर तालुका .