January 31, 2025 10:15 am

इंदापूर येथे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार होणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर येथे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार होणार

(निलेश गायकवाड)

इंदापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (AP) व महायुतीच्या घटक पक्ष यांच्या वतीने नवनियुक्त कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा रविवारी (दि. २२) नागरी सत्कार करण्यात येणार आहे. मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यायानंतर प्रथमच इंदापुर तालुक्यात येत आहेत.

या बाबत इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (AP) यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नामदार दत्तात्रय मामा भरणे यांची निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर नागरिक सत्कार रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजता इंदापूर येथील श्री वाघ पॅलेस येते होणार आहे. अशी माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री हनुमंत कोकाटे व इंदापूर शहर अध्यक्ष श्री बाळासाहेब ढवळे यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!