मंत्रीपद उपाध्यक्ष नाही अन प्रतोदपद ही गेले हे होत्याचे न होते तें झाले. ही पतंग कटली कुठून??
अमळनेर : विक्की जाधव
नुकतीच विधानसभेच्या निवडणुकीत पार पडल्या अमळनेर मतदार संघ हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता. तिरंगी लढतीत माजी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शिरीष चौधरी आणि डॉक्टर अनिल शिंदे यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला खरा. परंतु
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अनिल पाटील यांना मंत्रिमंडळातून नुकतीच वगळण्यात आले. हे कटी पतंगचे सत्र एवढ्यावरच थांबले नाही. तर विधानसभेचे उपसभापती पद राष्ट्रवादीच्या वाटेला येणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या परंतु तोंडातला घासही गेला. अनिल पाटलांकडे पक्षाचे प्रतोद पद होते. तेथेही पक्षाचे सर्वसर्वा अजित पवार यांनी चेतन विठ्ठल तुपे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याने अनिल पाटील यांना कोणतेच पद दिले गेलेले नाही म्हणूनच की काय??
यालाच अमळनेरच्या राजकारणातला ट्विस्ट म्हणावा का??
आमदार अनिल पाटलांची पतंग नेंमकी कटली कोठून?? नंदुरबार?? जळगाव?? धरणगाव?? दिल्ली?? कीं थेट बारामती??
अपक्ष? राष्ट्रवादी?? कीं दस्तूर खुद्द भाजपा काही ही झाले तरी या राजकीय वर्तुळात अमळनेर तालुक्याचे नुकसान झालेचं समजा
अमळनेरचे काय चुकले अजित दादा??
अनिल दादा मंत्री असतांना सुप्रियाताईंनी ही लाडक्या बहिणीचा अर्ज करावा आम्ही त्यांनाही 1500 रुपये देऊ आ. अनिल पाटील.
असे जाहीपणे बोलणे चुकले का..??
अमळनेरचे काय चुकले अजित दादा??
अमळनेरच्या विकासात भर घालणाऱ्या तरुणांना रोजगारा पासून वंचित ठेऊन सूतगिरणीचा कामात आणला अडथळा हेचं भोवले का???
आमदार आणि मंत्रीपद असून देखील पक्ष्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिले होते राजीनामे पक्ष बांधणीच्या कामात कमी पडलेले आमदार अनिल पाटील यांच्यावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना समजूत काढण्यासाठीच मंत्री अनिल पाटील यांना डावले जात आहे का?? कीं १५ ते २० दिवसापासून कामाला लागलेल्या बंधूनी आपल्या धाग्याने काटली पतंग?? अमळनेरच्या विकासाची पॅसेंजर थांबली कुठे याचे पडसाद येणाऱ्या दिवसात नक्कीच समोर येतील.