सालाबादप्रमाणे या वर्षीही आदेश परिवार इंदापूर यांच्या कडून दत्त जयंती उत्साहात साजरी.
(निलेश गायकवाड)
साक्षात गाणगापूर सारखी प्रचिती आल्याची अनेक भक्तांची वाच्यता.
गुरु शिवनाथ महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य गण व आदेश परिवाराकडून पारंपरिक पद्धतीने पूजा विधी करुन व येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करुन साजरी करण्यात आली.
या वेळी 300 ते 400 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरु शिवनाथ महाराज पवार बोलताना म्हणाले की पुढील वर्षी यापेक्षा चांगले नियोजन व मोठी दत्त जयंती साजरी केली जाईल.
तसेच सर्व भावीक भक्तांना महाराजांनी आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.