अमळनेरात स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त वृक्षारोपण
अमळनेर : विक्की जाधव
येथे स्व. गोपीनाथ मुंडे जयंती निमित्त नमो नगर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.सुरुवातीला अमळनेर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप ठाकूर, विजय बारी यांनी प्रतिमा पूजन केले. वंजारी समाज बांधवांनी नमो नगर, चिंतामणी कॉलनी परिसरात वृक्षारोपण केले. त्यावेळी प्रा. महादेव तोंडे,सोमनाथ वंजारी,प्रा. सुनील गर्जे, सतीश कांगणे,प्रदीप कायंदे, प्रमोद लटपटे,कुंदन पाटील, समाधान पाटील,विजय
राजपूत उपस्थित होते. वृक्षारोपणाचे सर्व साहित्य पत्रकार दिनेश पालवे यांनी दिले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी अमळनेर शहरातील मुंडे यांना मानणाऱ्या सर्वानी सहकार्य केले.