December 18, 2024 2:17 am

निकिता पाटील यांची जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात लिपिक पदावर निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

निकिता पाटील यांची जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात लिपिक पदावर निवड

 

अमळनेर : विक्की जाधव. 

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाची विद्यार्थिनी निकिता राजू पाटील या विद्यार्थिनीने 2023 च्या जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक परीक्षेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे,त्यांची निवड गुणवत्ता यादी क्रमांक 59 नुसार कनिष्ठ लिपिक या पदावर झाली आहे. शासनाने ही मेरिट लिस्ट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केले.

निकिता पाटील ह्या सन 2020 ते 2022 या शैक्षणिक वर्षात प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन मिळविलेले यश हे कौतुकास्पद स्वरूपाचे आहे, या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे यांनी निकिता पाटील या विद्यार्थिनीस गुणगौरव चिन्ह,प्रतापिय देऊन सत्कार केला.याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सह सचिव डॉ.धीरज वैष्णव,करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,डॉ.विजय बी मांटे,रुसा व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, गणित विभागाच्या प्रमुख डॉ.नलिनी पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,गणित विभागातील डॉ.वंदना भामरे,प्रा.रोहन गायकवाड, प्रा.प्रेरणा सोनवणे,प्रा.प्रियंका पाटील,प्रा.शशिकांत जोशी,कुलसचिव राकेश निळे आदींनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल निकिता पाटील यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!