प्रा डॉ विजय गाढे हे “डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार -2024” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
अमळनेर : विक्की जाधव
सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रा डॉ विजय गाढे यांच्या कार्याची दखल घेत दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीने या वर्षांचा खान्देशातून “डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप -2024” पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय साहित्य अकादमी,दिल्ली चे ४० वे राष्ट्रीय संमेलन दि. ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे पार पडले.
प्रा डॉ विजय गाढे हे खान्देशात शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अग्रणी भूमिका घेत असतात. प्रा डॉ विजय गाढे पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. गाढेसंरा कडे विविध समस्येला वाचा फोडण्याची सुप्त कला आहे. प्रा.डॉ विजय गाढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलेली आहे. बहुजन समाजातील समस्याग्रस्त लोकांसाठी यापुढील जीवन व्यतीत करण्याचे त्यांनी ठरवले आहे. आपल्या धारदार लेखणीने बहुजनांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने चालू ठेवण्याचे त्यांनी सूचित केले.
बहुजन समाजाने एकत्रित येऊन अन्याया विरोधात लढा उभारला पाहिजे, या विचाराने समाजातील दुही संपविण्यास ते प्रयत्नशील आहेत.भ्रष्ट प्रशासन विरोधात आपल्या लेखणीतून ते अनेकदा आसूड ओढत असतात. यावेळी समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले असून त्यांच्या वर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.