न्यायाच्या प्रतिक्षेत शिवसेना
उपनेते विजय (बंड्या) साळवी
काही दिवसांपुर्वी विजय साळवी यांनी उद्विग्नतेने आपल्या उपनेते पदाचा (ना) राजिनामा पक्षाकडे दिला होता. त्याची कारण मिमांसा साळवी यांनी एक ह्ददयस्पर्शी पत्राद्वारे केली होती. बंड्या साळवी हे कट्टरतेचे प्रतिक असलेले निष्ठावंत शिवसैनिक. गेली चार दशके ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत.पक्षफुटी पर्यंत ते एकनाथ शिंदे यांचे खासमखास होते. बंड्या साळवी यांचे महत्व व मोल एकनाथ शिंदेंनी ओळखले होते.बंड्या साळवी हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक ! त्यांनी शिवसेना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवला.त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर अनेक राजकिय गुन्हे दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली व शिवसेनेचे बिनीचे शिलेदार फोडण्याचा सपाटा लावला. त्यासाठी साम, दाम, दंड व भेद नीतीचा गैरवापर मुक्तहस्ते केला.
विजय उर्फ बंड्या साळवी आपल्या जाळ्यात अलगद सापडेल कारण तो तर आपला खास माणूस आहे, परंतू शिंदेंचा हा भ्रम बंड्या साळवींनी पार धुळीस मिळवला. तो माझ्या बंडात सामिल होत नाही म्हणजे काय ? त्याला दाखवतोच माझा इंगा ! या अविर्भावात एकनाथ शिंदे चवताळले. फसवणीस नावाचा गृहमंत्री सोबत होताच, त्याच्या मदतीने विजय साळवीं वर तडिपारीच्या नोटीसांचा धडाका लावला.ज्या बंड्या साळवीने एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्हाप्रमुख व पालक मंत्री होते तेव्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली सामाजिक व धार्मिक मुद्यांवर आदोलनं केल्याने गुन्हे दाखल झाले होते, त्याच गुन्ह्यांचे भांडवल करून तडिपार करण्याचे मनसुबे रचले. परंतू बंड्या साळवी हा दिघेसाहेबांचा खराखुरा शिष्य असल्याने तडिपारीच्या नोटीसांची सूरनळी करून टाकली.
बंड्या साळवी तडिपारीलाही जुमानत नाही, म्हटल्यावर हिंदूत्वाच्या रक्षणासाठी बाहेर पडलो ! म्हणणा-या ढोंगी हिंदू धर्म रक्षकाने विजय तरूण मंडळाच्या गणेशोत्सवातील देखावा जप्त करून सूड
उगवण्याचा नाठाळपणा दोन वर्षापुर्वी केला होता. या अतिरेकी कारवाई विरोधात बंड्या साळवीने न्यायालयात धाव घेतली व परवानगी मिळवून नाकावर टिच्चून गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे शिंदे व त्यांच्या नापाक इराद्यांची महाराष्ट्रात बदनामी झाली.
*निव्वळ बाळासाहेब व उद्धवसाहेबांच्या शिवसेनेसाठी हा कडवट शिवसैनिक शिंदेंच्या आव्हानांना न जुमानता पहाडासारखा उभा आहे. मात्र उपनेते पद असूनही मला पक्ष विश्वासात न घेता पदांवर नियुक्त्या करतो, विधान सभा निवडणूकीच्या वेळीही मला विश्वासात घेत नसतील तर मला उपनेते पद हवेच कशाला ? असे म्हणत आपल्या पदाचा राजिनामा दिला. मात्र त्याच वेळी मी पदाचा राजिनामा देत असलो तरी अखेरपर्यंत उद्धवसाहेबांसोबतच राहणार आहे,हे निक्षुन सांगितले.*
सद्या निष्ठावंत शिवैनिकांची कदर केली जात नाही, आयाराम गयारामांसाठी रेड कार्पेट जरूर घाला कारण राजकारण व सत्ताकारणासाठी ती तुमची निकड असेल तरी पायाच्या दगडांना विसरू नका. त्यांच्यासाठी पक्षशिस्तीच्या नावाखाली गेली अडिच वर्षे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत साथ देणा-या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करू नका,आमची जास्त काही अपेक्षा नाही, मात्र उपेक्षा करू नका.ती आमच्या जिव्हारी लागते. आजवर असंख्य शिवसैनिक दूरावले आहेत व या उपेक्षेमुळेच पलिकडे आश्रयाला गेेलेत,आम्ही निष्ठावंत आहेत, आम्ही पायाचे दगड आहोत, बाळासाहेबांच्या भाषेत आम्ही कवचकुंडलं आहोत, तरी आमची उपेक्षा करू नका ! सन्मानाची वागणूक द्या,आम्ही कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्यावर नाराज झालो तर आमची नाराजी दूर करून पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा ! इतकीच अपेक्षा आमच्यासारख्या निष्ठावंतांची असते.
विजय साळवी हा मातोश्रीचा विश्वासू आहे, एकनिष्ठ आहे, त्याची नाराजी दूर करायला दोन मिनिटे व चार शब्दही पुरेसे आहेत.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०