आमचा लाडका भाऊ फक्त शिरीष दादा चौधरी. महिलांसाठी उपक्रमशील शिक्षण देऊन तालुक्यात थाटनार रोजगाराच्या संधी..
महिला बचत गट मेळावा: स्वावलंबनासाठी नवीन व्यवसाय कल्पना, महिलांना उत्स्फूर्त पाठिंबा..
अमळनेर : विक्की जाधव
झेप फाउंडेशन आणि श्री. शिरीष दादा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने काल महिला बचत गट मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी शिरीष दादांच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांना पूर्ण पाठिंबा दिला, तर आंतरराष्ट्रीय उद्योजिका आणि झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. रेखा चौधरी यांनी महिलांसाठी नवीन व्यवसाय कल्पनांची ओळख करून महिलांसाठी घरी बसून करता येणाऱ्या व्यवसाय कल्पना सादर केल्या. यामध्ये “दिया बाती प्रॉजेक्ट मध्ये शेणापासून दिवे” नावाचा व्यवसाय विशेष आकर्षण ठरला. हा व्यवसाय गायच्या शेणापासून दिवे तयार करण्याचा असून, हा एक स्वच्छ, सोपा आणि कमी खर्चात सुरू करता येणारा व्यवसाय आहे. डॉ. रेखा चौधरी यांनी सांगितले की, “महिलांना लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. माझे काम महिला सक्षमीकरणात आहे, तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांसाठी लघुउद्योग निर्माण करणे, जेणेकरून त्या कोणाकडेही हात पसरू नयेत आणि सरकारी योजनेवर अवलंबून न राहता स्वावलंबी होऊन स्वत: कमाई करू शकतील.मी जेवढं शक्य आहे, तेवढं महिलांसाठी करत राहीन. त्यांनी स्वावलंबनासाठी विविध संधींची ओळख करून दिली, ज्या महिलांना घरबसल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतात.
डॉ. रेखा चौधरी यांचे नाव भारतातील “टॉप 30 महिलांमध्ये” समाविष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रपती मुर्मू आणि नीता अंबानी यांच्यासोबत या यादीत त्यांचे नाव गौरवाने घेतले जात आहे. महिलांचा शिरीष दादांच्या योजनांना पाठिंबा:
महिलांनी शिरीष दादांच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. दादा निवडून आल्यावर महिलांसाठी रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असा विश्वास महिलांनी व्यक्त केला .दादांच्या नेतृत्वासाठी महिलांची प्रार्थना: कार्यक्रमादरम्यान महिलांनी शिरीष दादांच्या विजयासाठी प्रार्थना केली. “दादांचे नेतृत्व आम्हाला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाईल,असे त्यांनी ठामपणे सांगितले.
झेप फाउंडेशनचा विशेष उपक्रम:
झेप फाउंडेशनने महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी लहान उद्योग, बचत योजना, आणि घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांनी जाहीर केले की आम्हाला आश्वासनं नकोत, तर आमच्या स्वाभिमानासाठी आणि स्वावलंबनासाठी दादांचे विजयी नेतृत्व हवं आहे.”
महिला बचत गट मेळावा हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय होता. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शिरीष दादा आणि डॉ. रेखा चौधरी यांचा हा पुढाकार भविष्यासाठी एक दिशादर्शक ठरेल.
गावागावांतून एकच आवाज: “शिरीष दादांचे नेतृत्व आणि रेखा ताईंची प्रेरणा आमचं भविष्य उज्ज्वल करेल.”