एकनाथ शिंदे आता मामु होणार!
लेख -४ था
खरं वाटत नसेल तर हे वाचा. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे असंवैधानिक मुख्यमंत्री म्हणून अडिच वर्षे कार्यरत होते. आत्ता त्यांची सद्दी संपली. यापुढे ते आयुष्यात ते कधी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची सूतराम शक्यता नाही. अवघे ४० आमदार असताना २८८ संख्याबळाच्या विधानसभेत मिंधेंना मुख्यमंत्री बनवणे हा पाहुण्याच्या हाताने शत्रूवर वार करण्याचा भाजपाच्या कुटनितीचा भाग होता. आपले १०५+ आमदारांचे संख्याबळ असताना फितुरीचे बक्षिस म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर बसवून त्यांचा मामु केला.
लोकसभेतील दारूण पराभव व मुखभंग झाल्याने भाजप युती भांबावून गेली. त्यामुळेच महिलांना १५०० ची खैरात वाटून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. विधान सभा निवडणूकीत युतीला बहुमत मिळणे दुरापास्त आहे. अदृश्य शक्तिने काही चमत्कार केला व बहुमत मिळाले तरी एकनाथ शिंदे पुुन्हा मुख्यमंत्री होऊच शकणार नाहीत याचे संकेत मिंधेंचेच पितासमान आलाकमान अमितभाई शहा यांनी दिले आहेत. मिंधेंचा उपयोग भाजपने नि×× सारखा करून घेतला आत्ता त्यांची गरज उरलेली नाही व मिंधेंची बार्गेनिंग पॉवर शून्यावर आणून ठेवली आहे. त्यामुळे हे नकली व दात काढलेले वाघ आत्ता डरकाळी फोडणे सोडा, साधे गुरगुरूही शकणार नाहीत.
कारण जागा वाटप करताना भाजपाने मिंधे गटाच्या तोंडाला पाने पुसत नाममात्र जागा देऊन त्यांचे कमीत कमी आमदार कसे निवडून येतील ? याची तजवीज करून ठेवली. भाजपाने १५५ उमेदवार उभे केले आहेत, त्यांचा स्ट्राईक रेट ५० राहीला तरी ७०/ ७५ आमदार येतील त्याच वेळी मिंधेंचे २५ आमदार निवडून आले तरी तो चमत्कार मानला जाईल. अजित पवार गटाचे गाडे १० ते १५ वरच रेंगाळेल. खुद्द अजित पवारांचा बारामतीत पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती १२० च्या पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे मिंधेंना मुख्यमंत्री पद सोडा विरोधी पक्ष नेतेपदही मिळणार नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या समोर गद्दार बरोबरच असंवैधानिक माजी मुख्यमंत्री अर्थात मामु कायमचे लागणार ! यदाकदाचित युतीने तोडफोड करून बहुमत मिळवले तरी मी पुन्हा येईन फेम देवेंद्र फसवणीस हे मुख्यमंत्री होतील व मिंधेंवर उपमुख्य मंत्री पद स्विकारण्याची नामुष्की येईल.कदाचित विनोद तावडे हे ही मुख्यमंत्री होऊ शकतील.
जर महाविकास आघाडीस बहुमत मिळाले व ठाकरे यांच्या शिवसेनेस दुस-या क्रमांकाच्या जागा आल्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिल्लीतून मिळाले आहेत. राहूल गांधी व शरद पवार या दोघांची यास संमती असल्याचे समजते.निवडणूकीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झाले असते तर महाविकास आघाडीस अधिक जागी यश आले असते.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०